MSRTC: नाशिक-पुणे महामार्गावर बर्निंग ‘शिवशाही’चा थरार! बघा व्हिडिओ

148

नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सिन्नर जवळील माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात आज, बुधवारी सकाळी 7.30 च्या सुमारास एसटी महामंडळाच्या बसचा द बर्निग बसचा थरार बघायला मिळाला. सुदैवाने बसमधील 45 प्रवाशांना बसबाहेर काढण्यात चालकाला यश आले. गेल्या काही दिवसात सतत लागणाऱ्या बसेसच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रशासनाकडून याबाबत गंभीर दखल घेण्यासाठी विनंती करण्यात येत आहे.

(हेही वाचा – राष्ट्रीय महामार्गावर अचनाक MSRTC बस पेटली, अमरावतीतील बर्निंग बसचा बघा व्हिडिओ )

नाशिक येथून सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन शिवशाही बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. सिन्नर येथे थांबल्यानंतर ती पुढे संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाली. माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात अचानक बसमधून धूर निघाल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवासी बस खाली उतरले.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथून पुण्याच्या दिशेने शिवशाही क्रमांक एम. एच. 06/ बी डब्ल्यू 0640 जात असताना माळवाडी येथे अचानक बसच्या पाठीमागील बाजूने पेट घेतला. चालकाच्या लक्षात आले की गाडीच्या पाठीमागच्या बाजूला धूर निघत आहे. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत गाडीत प्रवास करणाऱ्या 42 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यानंतर गाडीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी सिन्नर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्याची माहिती मिळतेय.

बघा व्हिडिओ

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.