सरकारी कर्मचाऱ्यांना आता आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनवेळा वाढवला जातो. कर्मचाऱ्यांचा डीए किती वाढणार हे एआयसीपीआय निर्देशांकावर अवलंबून आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. आता कर्मचाऱ्यांची डीएमध्ये पुढील सुधारणा जानेवारी २०२३ पासून होणार आहे. जानेवारीत महागाई भत्ता ४२ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : 7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! १८ महिन्यांची DA थकबाकी लवकरच मिळणार?)
महागाई भत्ता ४२ टक्के होणार ?
याआधी कर्मचाऱ्यांना ३१ टक्के महागाई भत्ता मिळत होता, मार्च २०२२ मध्ये हा भत्ता ३४ टक्के करण्यात आला. महागाई भत्ता वाढीच्या निर्णयाचा फायदा ५० लाख सरकारी कर्मचारी आणि ६१ लाख पेन्शनधारकांना झाला. ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लक्षात घेऊन केंद्र सरकार डीएमध्ये ३ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. अहवाल सूचित करतात की पुढील डीए वाढ ४ टक्के असेल ही वाढ मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांचा भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के होईल.
फिटमेंट फॅक्टर ३ पट वाढल्यास
पुढील वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर फिटमेंट फॅक्टर वाढीचा निर्णय सरकार घेऊ शकते. जर सरकारने फिटमेंट फॅक्टर ३ पट वाढवला तर भत्ते वगळून कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजार X २.५७ = ४६ हजार २६० रुपये होईल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यास पगार २६ हजार X ३.६८ = ९५ हजार ६८० रुपये होईल. तसेच जर सरकारने तीन पट फिटमेंट फॅक्टर मान्य केले तर वेतन २१ हजार X ३ = ६३ हजार रुपये होईल.
Join Our WhatsApp Community