मुंबईतील जे.जे. रुग्णालयामध्ये जवळपास २५ ते ३० वर्षे काम करणारे बदली कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. २७ जुलै २००३ आणि १४ फेब्रुवारी २०२२ रोजी औद्योगिक न्यायालयाकडून जे.जे. रुग्णालयातील बदली कर्मचाऱ्यांचीद रुग्णालयात कायमस्वरुपू नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. दोन्ही न्यायालयांच्या आदेशानंतरही बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी कायम सेवेत सामावून घेण्यास टाळाटाळ होत असून २५ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप जे.जे. रुग्णालयातील न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या बदली कर्मचाऱ्यांनी केला आहे.
( हेही वाचा : 7th Pay Commission : नववर्षात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर! महागाई भत्ता ४२ टक्के होणार ?)
बदली कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
जे. जे. रुग्णालयात १२२ असे कर्मचारी आहेत. यामध्ये ३० महिला कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून ते कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची अविरत सेवा करत आहेत. कोरोनाच्या काळात दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला मात्र त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आलेली नाही.
बदली कामगार म्हणून काम करताना रजा घेणे शक्य होत नाही, कुटुंबाला वेळ देणे शक्य होत नाही, आम्ही २५ वर्षांपासून कायम सेवेसाठी संघर्ष करीत आहोत मात्र राज्य सरकार आमची फसवणूक करीत असून, याप्रश्नी राज्य सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. असेही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. याआधी सेंट जॉर्ज रुग्णालयातील बदली कर्मचाऱ्यांनी कायम सेवेत घेण्यात आले आहे. त्यामुळे जे.जे. मधील कर्मचारी आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
Join Our WhatsApp Community