पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांचे मुनगंटीवारांसह लोढांनी केले कौतुक!

186

सेवा विवेक सामाजिक संस्थेच्या पालघर जिल्हातील आदिवासी महिलांतर्फे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि पर्यटन, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांना बांबूपासून हस्तकलेद्वारे बनवलेल्या वस्तू भेट दिल्या. त्या प्रसंगी त्यांनी सेवा विवेकच्या कार्याचे कौतुक केले. आदिवासी महिलांची भेट स्वीकारताना दोन्ही मंत्र्यांना त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

साप्ताहिक विवेक आयोजित विनित तेलंग यांनी लिहलेल्या, लतादीदींच्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा रवींद्र नाट्य मंदिर येथे मंगळवारी पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि प्रर्यटन, कौशल्य विकास आणि उधोजकात, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, जेष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या हस्ते झाले. यावेळी हिंदुस्थान प्रकाशनचे अध्यक्ष रमेश पतंगे, विवेक साप्ताहिक चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, सेवा विवेक चे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड, सौ. राजकुमारी गुप्ता -समाजसेवक, प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती भोईर संस्थेसोबत काम करणाऱ्या आदीवासी बांबू कारागिर महिला नम्रता सांबरे आणि रजनी सांबरे उपस्थित होत्या.

महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण

सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर काम करत आहे जिल्ह्यातील आदिवासी गरजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त व्हावा,  या हेतूने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते.

फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची संधी

पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडोहून अधिक महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबूपासून उत्तम दर्जेदार पर्यावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे. उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे. या वर्षी महिलांनी बनवलेल्या राखी व कंदीलांना विदेशातही मागणी होती. तसेच वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात. यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर, मोबाईल होल्डर, पात्राधर, फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार करतात. या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घरची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहे.

(हेही वाचा – Mhada Lottery 2022: म्हाडाच्या सोडत रकमेत वाढ? आता किती असणार डिपॉझिट?)

गेल्या वर्षी सेवा विवेकच्या कार्याचा माजी राष्ट्रपती व महामहीम राज्यपाल यांनी कौतुक केले आहे. माजी राष्ट्रपतीद्वारे हस्तकला प्रशिक्षित आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला. आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला या संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत तसेच नवीन महिलांना त्या प्रशिक्षण देत आहेत. या मुळेच आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.