भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना पोलिसांकडून धक्काबुक्की, डोळ्याला गंभीर इजा

184

सध्या काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेचा आरंभ करण्यात आला आहे. या यात्रेत राहुल गांधींसह सर्वच काँग्रेस नेते सहभागी होताना दिसत आहेत. ही यात्रा आता तेलंगणा येथे पोहोचली आहे. यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते देखील या यात्रेत सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री हे या यात्रेत सहभागी झाले असताना त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

राऊतांना धक्काबुक्की

दक्षिण भारतातून प्रारंभ झालेली भारत जोडो यात्रा आता हैद्रबाद येथे पोहोचली असताना या यात्रेत नितीन राऊत सहभागी झाले. यावेळी राऊतांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्काबुक्कीत नितीन राऊत खाली पडले आणि त्यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या हात आणि पायालाही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. नितीन राऊत यांना उपचारासाठी हैद्राबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातही यात्रेचे आयोजन

यानंतर काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात 11 दिवसांसाठी भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे देखील सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्ते देखील या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.