Google ची युजर्सना भेट! आता Workspace स्टोरेज स्पेस वाढणार!

136

गुगलने आपल्या युजर्ससाठी एक मोठी भेट दिली आहे. गुगलने वर्कस्पेसची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत कंपनीने Google Workspace मध्ये 15GB स्टोरेज न करता 1TB सुरक्षित क्लाउड स्टोरेजपर्यंत वाढवले ​​आहे. आतापर्यंत गूगलकडून प्रत्येक यूजरला मोफत 15GB क्लाउड स्टोरेज देण्यात येत होते. पण, आता गूगलने 15GB स्टोरेजऐवजी तब्बल 1TB सिक्योर क्लाउड स्टोरेज मिळणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, जुन्या यूजर्सचे अकाउंट अपग्रेड केले आहेत. यासाठी यूजरला काहीच करण्याची आवश्यकता नसणार आहे.

(हेही वाचा – Mhada Lottery 2022: म्हाडाच्या सोडत रकमेत वाढ? आता किती असणार डिपॉझिट?)

गुगलकडून देण्यात आलेल्या या खुशखबर नुसार, कंपनीने वर्कस्पेस युजरसाठी स्टोरेजे कॅपेसिटी वाढवली आहे. म्हणजेच गुगल वर्कस्पेस इंडिव्हिज्युअल अकाउंट 15GB स्टोरेजऐवजी 1TB सिक्योर क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. यासाठी युजर्सना कोणतीच वेगळी सेटिंग करण्याची गरज नाही. सर्व अकाउंट्स ऑटोमॅटिकली 15GB स्टोरेजवरुन 1TB स्टोरेजमध्ये कन्व्हर्ट होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

गूगलने एका ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. कंपनीच्या या पोस्टनुसार, वर्कस्पेस इंडिव्हिज्युअल यूजर्ससाठी जास्त फीचर्सदेखील आणले जाणार आहे. विशेष म्हणजे गूगल Workspace (आधी GSuite) एक क्लाउड-बेस्ड प्रोडक्टिव्हिटी सूट आहे. हे इंडिव्हिज्युअल यूजर आणि ऑफिस टीमला कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची सुविधा देते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.