टी-20 विश्वचषकात भारताने बुधवारी बांग्लादेशवर मात करत उपांत्य फेरीसाठीचा आपला मार्ग मोकळा केला आहे. पावसाच्या एंट्रीनंतर झालेल्या थरारक सामन्यात भारताने अखेर बांग्लादेशवर विजय मिळवला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने बांग्लादेशवर धावांनी मात केली आहे. भारताच्या या विजयामुळे संपूर्ण देशभरात जल्लोष करण्यात येत आहे.
भारताने बांग्लादेशसमोर 185 धावांचे तगडे आव्हान दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या बांग्लादेशचा सलामीवीर लिटॉन दासने सुरुवातीला धडाकेबाज फलंदाजी करत केवळ 7 षटकांत 66 धावा ठोकल्या. त्यानंतर आलेल्या पावसाने सामन्यात व्यत्यय आणला आणि भारताच्या विजयावर पाणी फिरणार की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. कारण डकवर्थ लुईस नियमानुसार, बांग्लादेशला 7 षटकांत 49 धावांची गरज होती.आणि बांग्लादेशचा संघ हा त्यावेळी 16 धावांनी पुढे होता.
रोमहर्षक विजय
पण पाऊस थांबल्यानंतर बांग्लादेशला 16 षटकांत 151 धावांचे आव्हान देण्यात आले. त्यामुळे पावसानंतर पुन्हा खेळायला आलेल्या बांग्लादेशला विजयासाठी 54 चेंडूंत 85 धावांची गरज होती. पण सामना सुरू होताच लगेच 8व्या षटकात के एल राहुलच्या अप्रतिम थ्रोमुळे लिटॉन दास धावबाद झाला. त्यानंतर बांग्लादेशच्या फलंदाजीला गळती लागायला सुरुवात झाली. अखेर 16 षटकांत बांग्लादेशला 6 बाद 145 धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आले.
भारताकडून अर्शदीप सिंगने 4 षटकांत 38 धावा देत 2 गडी बाद केले, तर हार्दिक पांड्याने देखील 3 षटकांत 28 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीला 1 विकेट मिळाली आहे.
Join Our WhatsApp Community