खारघरच्या टाटा पॉवर परिसर भागात गेल्या दोन दिवसांपासून वाघ दिसून येत असल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण होते. मात्र खारघरमध्ये वाघाचा वावर नसल्याचे अखेर वनविभागाने स्पष्ट केले आहे. खारघरला वाघ कुठेही आढळून आलेला नाही तसेच वनाधिकाऱ्यांच्या टीमला वाघाचा वावर दिसून आला नाही, अशी माहिती ठाणे वनविभाग (प्रादेशिक) चे मुख्य वनसंरक्षक रामाराव यांनी दिली.
( हेही वाचा : बेस्ट बसमध्ये वस्तू विसरलात? आता भरावे लागणार १४ टक्के शुल्क)
खारघर परिसरात तीनवेळा वाघाचे दर्शन होत असल्याची माहिती टाटा पॉवर प्रदेशातील सुरक्षारक्षक देत होते. मात्र प्रत्यक्षात कोणीच वाघ पाहिला नसल्याचे वनविभागाच्या चौकशीत आढळले. आम्हाला वाघ दिसल्याची माहिती एका महिलेकडून मिळाली. प्रत्यक्षात महिलेनेही वाघ पाहिला नव्हता. महिलेच्या मोबाईलवर बिबट्याचा व्हिडीओ कोणीतरी पाठवला होता. तपासाअंती व्हिडीओही साताऱ्यातला असल्याचे वनाधिकाऱ्यांना समजले. आजीवली शिवाजीनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती काही स्थानिकांनी वनविभागाला दिली असून, घटनेची पाहणी केल्यानंतरच ठोस बोलता येईल, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community