खेलो इंडिया : वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंची चमकदार कामगिरी

129

मोदीनगर उत्तरप्रदेश येथे 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2022 दरम्यान संपन्न झालेल्या दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला रँकिंग वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या आठ खेळाडूंनी सहभागी होत चांगली कामगिरी केली.

( हेही वाचा : खारघरमध्ये वाघाचा वावर? जाणून घ्या सत्य)

आकांक्षा किशोर व्यवहारे हिने 40 किलो युथ वजनी गटात तीन नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित करीत सुवर्णपदक व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. 55 किलो वजनी गटात नूतन बाबासाहेब दराडे हिने पहिल्याच राष्ट्रीय वरीष्ठ गटाच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली, 59 किलो वजनी गटात ज्युनिअर मध्ये वैष्णवी वाल्मिक इप्पर हिने आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत सहावा क्रमांक व रोख तीन हजार रुपये, 64 किलो वजनी गटात ज्युनिअर मध्ये वैष्णवी जनार्धन उगले हिची पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा होती. 71 किलो वरीष्ठ गटाच्या स्पर्धेत निकिता वाल्मिक काळे हिने चांगली कामगिरी केली असून 71 किलो युथ व ज्युनिअर मध्ये संध्या भास्कर सरोदे हिने चौथा क्रमांक पाच हजार रुपये व ज्युनिअर मध्ये सहावा क्रमांक तीन हजार रुपये प्राप्त केले. 76 किलो ज्युनिअरमध्ये धनश्री विनोद बेदाडे हिने पाचवा क्रमांक पाच हजार रुपये, 76 किलो युथ मध्ये करिष्मा रफिक शाह हिने चौथा क्रमांक पटकावला. आकांक्षा व्यवहारेला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका पोतदार एस एस, गुरुगोविंद सिंग हायस्कूचे अध्यक्ष बाबा रणजित सिंग जी व प्राचार्य सदाशिव सुतार महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर,सचिव प्रमोद चोळकर,भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने यांनी सर्व खेडाळूंचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.