डिसेंबर महिन्यात ‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई’ अभियान

273

‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील १५ वॉर्ड मध्ये १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून हा उपक्रम यशस्वी करूया असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

( हेही वाचा : पुण्यात ३ नोव्हेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन)

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, हे अभियान मुंबई महापालिका मार्फत राबविण्यात येणार असून त्यामध्ये सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्थाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. मुंबई उपनगरातील पंधरा वॉर्डमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना, स्वयंसेवी संस्था, शासनाचे सर्व विभाग, नागरिक यांना ज्या ज्या वॉर्डमध्ये शक्य होईल तिथे आपला परिसर, शाळा ,महाविद्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे, सागरी किनारे यांची स्वच्छता करावयाची आहे. असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या, मुंबई उपनगर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या शाळा महाविद्यालय, सर्व गृहनिर्माण सोसायट्या, सर्व रुग्णालये, सार्वजनिक ठिकाण, प्रत्येक शासकीय विभागाच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जनजागृती पर उपक्रम राबवणे, स्वच्छतेचे संदेश देणे, सागर किनारे स्वच्छ करणे, स्वच्छता अभियान राबवणे ज्या वॉर्डमध्ये असे उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक संस्थेला शक्य आहे तिथे त्यांनी मदत करावी. प्रत्येक शासकीय विभागांनी आपल्या अखत्यारीतील यंत्रणांना याची माहिती द्यावी. १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक दिवसाचा उपक्रम काय असेल याची माहिती सर्वांना कळविण्यात येईल.

या अभियानात शासकीय/निमशासकीय संस्थांबरोबरच नागरिक, खाजगी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, गृहसंकुले, यांना सहभागी करून घेउन अभियान समावेशक करणे, अभियान कालावधीत सर्वस्तरावर मोठ्याप्रमाणावर जनजागृती करून स्वच्छतेच्या सवयींमध्ये अमुलाग्र बदल (Behavioral Change) घडवून आणणे अभियानांतर्गत केलेल्या कार्यवाहींमुळे स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल घडवून सार्वजनिक स्वच्छतेबाबत स्थायी बदल घडवणे हा अभियानाचा उद्देश आहे. वॉर्ड निहाय होणाऱ्या उपक्रमांना बीएमसी तसेच शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, या सर्व कार्यवाहीसाठी संबंधित वॉर्ड ऑफिसर क्षेत्रस्तरावर समन्वय करतील असेही यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.