शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचे निधन

170

शेतक-यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे, शेतक-यांचे मार्गदर्शक आणि शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचे निधन झाले आहे. शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी 1980-81साली शेतक-यांसाठी जनआंदोलन उभारले होते.

आठ-दहा दिवसांपासून माधवरावांची प्रकृती अधिकच खालावली होती. माधवराव मोरे यांनी सन 1980-81 च्या काळात शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या सोबतीने संघटनेची स्थापना करुन शेतमालाला रास्त भाव मिळाला यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभारले होते. महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या या आंदोलनाने देशात शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली होती. या आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर केंद्र सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर पंजाबसह अनेक प्रांतात त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नावर लढा उभारला होता.

( हेही वाचा: परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश )

शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी झालेल्या लाठीमारात माधवराव मोरे यांना गंभीर दुखापत झाली होती. शेतकरी आंदोलनाची धार कमी न होता वाढतच गेल्याने तत्कालीन मुख्यमंत्री अ.र. अंतुले यांनी शरद जोशी, माधवराव मोरे, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे तत्कालीन अध्यक्ष माधवराव बोरस्ते यांच्याशी चर्चा करुन आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. या आंदोलनामुळे ऊसाला प्रथमच 300 रुपये प्रति टन तर, कांद्याला 100 रुपये क्विंटल भाव मिळाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.