एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर रोज नवीन निर्णय घेत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान ट्विटर कंपनीत होणारा खर्च कमी करण्याच्या धोरणामुळे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे. एलॉन मस्क हे कंपनीच्या साधारण 3 हजार 700 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची रणनिती आखत आहेत. या निर्णयामुळे ट्विटर या सोशल मीडिया कंपनीचे कर्मचारी जवळजवळ निम्म्याने कपात करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – 12 तास काम, साप्ताहिक सुट्टी रद्द; नियम मोडणाऱ्यांना कामावरून काढणार – एलाॅन मस्क)
इलॉन मस्क हे 44 अब्ज डॉलर ट्विटर अधिग्रहण करार पूर्ण करण्यासाठी पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करत असताना कंपनीच्या जवळपास 3700 कर्मचाऱ्यांना कपात करण्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कपात करण्यात येणार आहे, त्यांना एलॉन मस्क हे 4 नोव्हेंबरपासून सूचिक करण्यास सुरूवात करणार आहे.
ट्विटरच्या सॅन-फ्रान्सिस्को येथे असलेल्या मुख्यालयात एलॉन मस्क आणि त्यांची टीम कर्मचारी कपात आणि इतर धोरणात्मक बदलांबाबत अनेक पैलूंवर विचार करत आहेत आणि त्यावर काम करत आहेत. या अंतर्गत कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा विचार केला जात आहे. या बाबींमध्ये, ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे, त्यांना 60 दिवसांचा पगार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community