माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह खंडणी प्रकरणात निलंबित दोन पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहेत. पोलीस निरिक्षक गोपाळे व आशा कोरके अशी सेवेत पुन्हा समाविष्ट करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटकेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
( हेही वाचा: ‘सामना’च्या पहिल्या पानावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो; जाहिरातीने चर्चांना उधाण )
नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिका-यांविरोधातील अंतर्गत चौकशीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर दहा महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या या अधिका-यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यानी परमबीर सिंह, गोपाळे आणि कोरके यांच्यासह अन्य पाच अधिकारी, संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती.
ठाकरे सरकारच्या निर्णयांमध्ये बदल
परमबीर सिंह खंडणीप्रकरणात गोपाळे आणि कोरके यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, शिंदे- फडणवीस सरकार येताच नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. आता महाविकास आघाडीच्या काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Join Our WhatsApp Community