भारतीय जवान आता मार्शल आर्टने शत्रूला नामोहरम करणार

155

भारत- चीन सीमेवर तैनात असलेल्या इंडो- तिबेटियन बाॅर्डर पोलिसांच्या जवानांना आता इस्त्रायली मार्शल आर्ट व जपानी आईकिडो या मार्शल आर्टचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे या जवानांना शत्रूशी अधिक समर्थपणे मुकाबला करता येणार आहे. आयटीबीपीच्या जवानांना बाॅक्सिंग, कुस्ती, ज्यूडो- कराटे यांचे प्रशिक्षण आधीपासूनच देण्यात येत होते. त्यात आता काही नव्या गोष्टींची भर पडली आहे. एखादा जवान शस्त्रहीन असला तरी तो या प्रशिक्षणाच्या बळावर शत्रूचे नामोहरम करु शकतो.

15-20 हजार जवान आईकिडोमध्ये तरबेज आहे. जपानी आईकिडो या मार्शल आर्टचा आता समावेश करण्यात आला आहे.

( हेही वाचा: चीनमध्ये लॉकडाऊन, आयफोनच्या कर्मचा-यांना घरांत डांबले )

24 आठवड्यांचे प्रशिक्षण आयटीबीपीच्या जवानांना दिले जाते. त्यात इयामा रियू, शिन शिन आईकी, शुरेन काई शोडोकान आइकिदो, योशिकान, सेशनिनकाई, आदी स्टाइल व डावपेचांचाही समावेश आहे. आयटीबीपीने पंचकुला येथे आपल्या 15 ते 20 हजार जवानांना नव्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत इस्त्रायली मार्शल आर्ट व जपानी आईकिडो या मार्शल आर्टमध्ये तरबेज केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.