दिल्लीच्या नजीक असलेल्या गुरूग्रामध्ये बुधवारी अचानक वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई मोहीम करण्यात आली. वाहतूक नियम मोडणाऱ्यांमध्ये साधारण 150 हून अधिक लोकांना दंड बसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे 70 लोकं म्हणजे तब्बल निम्मे पोलीस कर्मचारी निघाले.
(हेही वाचा – ट्विटरच्या ३७०० कर्मचाऱ्यांना बसणार झटका! काय आहे इलॉन मस्क यांची नवा योजना?)
गुरुग्राम येथे बुधवारी ट्रॅफिक उल्लंघन करणाऱ्यांविरुद्धच्या मोहिमेदरम्यान 155 जणांमध्ये 70 पोलिसांचा समावेश होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस लाईन्स, पोलीस आयुक्त कार्यालय आणि स्थानिक न्यायालयाजवळ गुरुग्राम वाहतूक पोलिसांनी सुमारे 4 तासांची ही मोहीम चालवली होती, असे त्यांनी सांगितले. या 4 तास चालवलेल्या मोहिमेत 150 जणांना दंड आकारण्यात आला.
ट्रॅफिक पोलिसांनी 155 जणांना दंड ठोठावला, त्यापैकी 70 गुन्हेगार हे पोलिसच होते, ज्यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) यांना नियुक्त केलेल्या चालकाचाही समावेश होता. तर एका वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) यांना नियुक्त केलेला चालक सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना आढळला. यावेळी चालकाला दंड ठोठावण्यात आला, त्याला सीट बेल्ट लावण्याचाही सल्ला देण्यात आला. वाहतूक नियमांचे पालन न केल्याबद्दल अनेक पोलिसांना दंड ठोठावण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
Join Our WhatsApp Community