शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, सुषमा अंधारेंनी थेट नावच सांगितलं

164

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांच्या जोरावर राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते हे शिंदे गटात सामील होत असताना, आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक मोठे विधान केले आहे. शिंदे गटातील एक आमदार आमच्या संपर्कात आहे, त्यांच्यासाठी आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत

शिंदे गटात अनेक आमदार नाराज आहेत. त्यांच्यापैकी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. शिंदे गटात संजय शिरसाट फार अस्वस्थ आहेत. शिंदे गटात जाऊन शिरसाट यांना पश्चाताप होत आहे. त्यामुळे अजूनही आम्ही कुणासाठीच आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता शिंदे गटातून पुन्हा ठाकरे गटात इनकमिंगला सुरुवात होणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

(हेही वाचाः मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय)

आम्ही पातळी सोडून टीका करत नाही

सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत त्या शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका करत आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटातील नेते हे संयमी भाषेत बोलत आहेत. आम्ही कधीही पातळी सोडून कोणावरही टीका करत नाही, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.