‘इथे आमची गरजच काय?’, सीबीआय म्हणते या राज्यात एकही भ्रष्टाचाराची तक्रार नाही

170

सीबीआयच्या देशभरातील सर्व राज्यांमध्ये होत असलेल्या कारवाया या सर्वश्रुत आहेत. अनेक राज्यातील भ्रष्टाचारी कृत्यांवर सीबीआयची करडी नजर आहे. पण देशातील एक असेही राज्य आहे जिथे भ्रष्टाचाराची एकही तक्रार नसल्याचे सीबीआयने सांगितले आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये गोव्यात लाच घेणे किंवा उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा करणे याबाबतची एकही तक्रार नसल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या राज्यात सीबीआयची गरजच नाही, असे विधान गोव्याचे सीबीआय एसपी आशिष कुमार यांनी केले आहे.

आमची गरज काय?

गोव्यात भ्रष्टाचार होत असल्याचा एकही फोन गेल्या काही वर्षांत सीबीआयला आलेला नाही. जनता किंवा प्रसारमाध्यम यांच्यापैकी कोणाकडूनही आम्हाला तशी तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे जर का गोव्यात भ्रष्टाचारच नसेल तर मग या राज्यात आमची गरजच नाही, असे मत एसपी आशिष कुमार यांनी मांडले आहे.

(हेही वाचाः चीनमध्ये लॉकडाऊन, आयफोनच्या कर्मचा-यांना घरांत डांबले)

सीबीआयची माहिती

गेल्या वर्षभरात सीबीआयने तीन प्रकरणे दाखल केली आहेत. यापैकी दोन प्रकरणे ही कॅनरा बँकेतील कर्ज फसवेगिरीशी संबंधित असून एक प्रकरण उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या वाट्याशी संबंधित आहे. पण गेल्या चार वर्षांत आमच्याकडे एकही लाचखोरीची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. याबाबतची शेवटची तक्रार ही 2018 मध्ये दाखल करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.