विराट कोहलीवर फेक फ्लिडिंगचा आरोप करत बांगलादेश म्हणतंय…तर आम्ही जिंकलो असतो; नेमकं काय आहे हे प्रकरण?

135

टी-२० विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश विरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यानंतर बांगलादेशच्या संघाकडून काही निर्णयांवर नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच बांगलादेशच्या खेळाडूंनी विराट कोहलीवर ‘फेक फिल्डिंग’चा आरोप केला हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात…

( हेही वाचा : IND VS BAN : विराट कामगिरी! बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीने मोडला ‘हा’ रेकॉर्ड )

भारताने हा सामना ५ धावांनी जिंकला यावेळी भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. फिल्डिंगनंतर विराट कोहलीने फेक फिल्डिंगचा केल्याचा आरोप बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज नुरूल हसन याने लावला आहे. कोहलीने एका थ्रोदरम्यान फेक फ्लिडिंग केली होती आणि तेव्हा अम्पायरने नो बॉल दिला असता तर आम्ही सामना जिंकलो असतो असे नुरूल हसन म्हणाला.

काय आहे फेक फिल्डिंग?

बांगलादेश बॅटिंग करत असताना ७ व्या ओव्हरमध्ये पाऊस पडायच्या आधी लिटन दास आणि शांतो फलंदाजी करत होते. तेव्हा सीमारेषेजवळ उभा असणाऱ्या अर्शदीपने एक थ्रो किपरकडे केला. त्यामुळे मध्ये उभा असणाऱ्या विराटने बॉल त्याच्याकडे आहे अशी दाखवले. परंतु मूळात तेव्हा बॉल किपरपर्यंत पोहोचला होता.

सोशल मिडियावर याबाबत चर्चा सुरू झाली असून बांगलादेशचे चाहते नुरूल बरोबर असल्याचे म्हणत आहेत, तर दुसरीकडे भारतीय चाहत्यांचे म्हणणे आहे की, बांगलादेश पराभव पचवू शकत नाहीये.

फेक फिल्डिंगचा नियम काय सांगतो?

ICC ४१.५ च्या नियमांनुसार फेक फिल्डिंग म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कोणत्याही कृतीमुळे फलंदाजाच्या एकाग्रतेचा भंग होत असल्यास, पंच त्या चेंडूला डेड बॉल देऊ शकतात आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला अतिरिक्त ५ धावा देऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.