आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद पुन्हा एकदा चिघळत असल्याची चिन्ह असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य करत पुन्हा एकदा या वादावर पडदा टाकला आहे. हा वाद संपला असून, महाराष्ट्राच्या हितासाठी हे वाद बाजूला ठेऊन पुढे गेलं पाहिजे, अशी माझी दोघांनाही विनंती आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणा-कडू वादावर दिली आहे.
आमच्यासाठी हा वाद संपला
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आता संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी हे वाद बाजूला ठेवले पाहिजेत, अशी माझी त्यांना विनंती आहे. दोघांनीही आता सामोपचाराची भूमिका घेतली आहे. त्यामुळे माझ्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा वाद आत संपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः ‘मी घरात राणांची पत्नी पण बाहेर…’, राणा-कडू वादावर नवनीत राणांची प्रतिक्रिया)
राणा-कडू यांच्यातीव वाद
आमदार बच्चू कडू यांच्या मेळाव्यातील भाषणानंतर आमदार रवी राणा यांनी दम देणा-यांना घरात घुसून मारू असा थेट इशारा दिला होता. त्यानंतर रवी राणांचं मी स्वागत करतो, त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फूलं घेऊन तयार आहे. त्यांना माझ्या शरीराचे किती तुकडे करायचे आहेत ते त्यांनी सांगावं. मी त्यांच्या हातून मरण्यासाठी तयार आहे, अशी खोचक प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी राणांच्या विधानावर दिली होती.
Join Our WhatsApp Community