महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील ७५ हजार रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. याअंतर्गत गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या २९ विभागातील ७५ हजाप पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे.
( हेही वाचा : विराट कोहलीवर फेक फ्लिडिंगचा आरोप करत बांगलादेश म्हणतंय…तर आम्ही जिंकलो असतो; नेमकं काय आहे हे प्रकरण? )
कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने नोकरभरतीवर निर्बंध आणले होते. परंतु आता कोरोना काळ संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने ही मर्यादा उठवली आहे. त्यामुळे १०० टक्के नोकर भरती होणार आहे.
कोणत्या विभागात अंदाजित किती नोकर भरती होणार ?
- आरोग्य खाते – १० हजार ५६८
- गृह खाते – १४ हजार ९५६
- ग्रामविकास खाते – ११ हजार
- कृषी खाते – २ हजार ५००
- सार्वजनिक बांधकाम खाते – ८ हजार ३३७
- नगरविकास खाते – १ हजार ५००
- जलसंपदा खाते – ८ हजार २२७
- जलसंधारण खाते – २ हजार ४२३
- पशुसंवर्धन खाते – १ हजार ४७
किती जागा रिक्त ?
- गृहविभाग – ४९ हजार ८५१
- सार्वजनिक आरोग्य विभाग – २३ हजार ८२२
- जलसंपदा विभाग – २१ हजार ४८९
- महसूल आणि वनविभाग – १३ हजार ५५७
- वैद्यकीय शिक्षण विभाग – १३ हजार ४३२
- सार्वजनिक बांधकाम विभाग – ८ हजार १२
- आदिवासी विभाग – ६ हजार ९०७
- सामाजिक न्याय विभाग – ३ हजार ८२१
Join Our WhatsApp Community