अलिबाग येथील सारण गावाचे रहिवासी असलेल्या अनंत रामाकडवे (63) यांनी मरणोत्तर अवयवदानाचा नवा आदर्श गावात निर्माण केला. दुसऱ्यांदा पक्षाघाताचा त्रास झाल्यानंतर अनंत यांना वाचवणे कठीण होऊन बसले परंतु कुटूंबीयांनी यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करत अवयवदानाची गावात चळवळ सुरु केली.
(हेही वाचा – ब्रीच कँडीत दाखल असलेल्या शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दलची मोठी अपडेट)
सहा महिन्यांपूर्वी अनंत रामाकडवे यांना पक्षाघाताचा त्रास झाला होता. त्यावेळी उपचारानंतर त्यांची परिस्थिती सुधारली. शुक्रवारी अनंत रामाकडवे यांना पुन्हा चक्कर आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासानंतर त्यांना पक्षाघाताचे निदान केले. कुटूंबीयांनी अखेर वाशी येथील एमजीएम रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र उपचाराअंती त्यांना डॉक्टरांनी मेंदू मृत असल्याचे सांगितले.
कुटुंबात अवयवदानाविषयी माहिती होती, त्यामुळे आम्ही यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान केली अशी माहिती अनंत रामाकडवे यांच्या पुतणी एस शेळके यांनी दिली. आठ वर्षांपूर्वी परिचयाच्या व्यक्तीला नवे अवयव मिळाल्याने त्याचे आयुष्य बहरले. माझी सख्खी बहीणही अवयवदाता आहे. तिने मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. काकांच्या अवयवदानानंतर आम्ही कुटुंबीय अवयव दानासाठी पुढाकार घेऊ, या आशयाचे पत्र एस शेळके यांनी अवयव रुग्णालय प्रशासनाला धन्यवाद देत लिहिले.
Join Our WhatsApp Community