व्हॉट्सअॅप, फेसबुकप्रमाणे अनेक लोक संभाषणासाठी स्नॅपचॅटचा वापर करतात. काहीजण आपले फोटो सुद्धा या अॅपच्या माध्यमातून शेअर करतात. परंतु याच स्नॅपचॅटमध्ये आता बग सापडला असून वापरकर्त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. नाशिकच्या विद्यार्थ्याने हा बग शोधून काढला असून स्नॅपचॅटच्या My Eyes Only या प्रायव्हसी फिचरमध्ये हा बग आहे. या संदर्भातील स्नॅपचॅटचा स्वीकृती दर्शक ई-मेल या विद्यार्थ्याला मिळाला आहे.
( हेही वाचा : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती! अन्यथा परीक्षा देता येणार नाही)
प्रायव्हसी धोक्यात?
नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीतील डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या आयआयटी विभागामध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विशाल सटले या विद्यार्थ्याने स्नॅपचॅट या सोशल मिडीया अॅपमधील बग शोधला आहे. विशाल सटले मेटामध्ये इंट्नशिप करत असीन स्नॅपचॅटमधील हा बग त्याच्या निदर्शनास आला My Eyes Only या फिचरमध्ये कोणतेही खासगी फोटोही आपण सेव्ह करू शकतो हे फिचर तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. या फिचरमधील बग विशालने शोधून काढला आहे my eyes only मधील फोटो हॅकरला स्क्रिनशॉटच्या माध्यामातून आपल्याकडे ठेवता येऊ शकतात हे त्याने शोधून काढले आहे. वापरकर्त्याला याबाबत माहिती नसल्यामुळे यामुळे युजर्सची प्रायव्हसी ब्रेक होऊ शकते. यामुळे समाजमाध्यम आणि सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
My Eyes Only याला असणारी प्रायव्हसी सेटिंग यामुळे हे फिचर तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. कोणताही हॅकर ही माहिती स्क्रिनशॉटच्या माध्यमातून ठेवता येऊ शकते हे विशालने शोधून काढले आहे. हॅकर वन ही साईट बग शोधणाऱ्यांना रिवॉर्ड देते. या वेबसाईटमध्ये मोठ मोठ्या कंपन्या जॉईन आहेत. सध्या या बगवर काम सुरू आहे.
Join Our WhatsApp Community