ठाणे, दादर आणि कल्याण स्थानकातील गर्दी होणार कमी?

137

ठाणे, कल्याण आणि दादर स्थानकांत दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता मध्य रेल्वे विविध उपाययोजना करणार आहे.

त्यानुसार ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच आणि सहावर थांबणा-या दहा मेल एक्सप्रेस गाड्यांना सात आणि आठ क्रमांक फलाटावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय पाच आणि सहा क्रमांक फलाटावरील दुकाने हटवण्यात येणार आहेत. कल्याण स्थानकातीलही चार, पाच क्रमांक फलाटावरील दुकाने आणि तत्सम बांधकाम हटवणे आणि दादर येथील फलाटांच्या रुंदीकरणाची योजना आहे. ठाणे, कल्याण दादरमार्गे नियमित मेल एक्सप्रेस आणि विशेष गाड्या अशा दररोज 250 ते 300 मेल- एक्सप्रेस जातात. त्यात लोकल फे-यांचाही समावेश होतो.

10 मेल एक्सप्रेस गाड्यांना सात ते आठ क्रमांकाच्या फलाटावर थांबा देणार

यापूर्वी ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक सात आणि आठवर मेल- एक्सप्रेस गाड्यांना थांबा दिला जात होता. त्यानंतर त्यामध्ये बदल करुन पाच ते सहा क्रमांकावर मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास सुरवात झाली. मध्य रेल्वेने या फलाटांवर थांबणा-या 18 मेल-एक्सप्रेससाठी सात आणि आठ क्रमांकाच्या फलाटावर थांबा देण्यास सुरुवात केली. आता आणखी 10 मेल एक्सप्रेस गाड्यांना सात ते आठ क्रमांकाच्या फलाटावर थांबा देऊन गर्दी आटोक्यात ठेवण्यात येणार असल्याचे रजनीश कुमार गोयल यांनी सांगितले.

( हेही वाचा: मुंबईत पुन्हा खळबळ! आता ‘या’ भागात दहशतवादी हल्ला करण्याची धमकी )

कल्याण यार्डचे नूतनीकरण होणार 

कल्याण स्थानकाच्या तीन आणि चार क्रमांक फलाटावरील दुकाने व काही बांधकामे हटवणे, दादर स्थानकात मध्य रेल्वेच्या एक आणि दोन क्रमांकाच्या फलाटासह अन्य फलाटांची रुंदी वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे. रेल्वे जमिन विकास प्राधिकरणाकडून दादर स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठीचे सविस्तर प्रकल्प अहवाल आणि निविदाची प्रक्रिया रेल्वे जमिन विकास प्राधिकरणच राबवणार आहे. कल्याण यार्ड नूतनीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.