गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर झालेल्या भीषण अपघातात 130 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने पालिका मुख्य अधिकारी संदीप सिंग जाला यांना निलंबित केले आहे.
(हेही वाचा – दिवाळी, छठपूजा संपवून परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; 11 जण ठार)
या अपघातानंतर पोलिसांनी 9 जणांना अटक केली होती. स्थानिक न्यायालयाने या 9 जणांपैकी चार जणांना 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर उर्वरित 5 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यादरम्यान गुजरात सरकारने या घटनेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. गुरुवारी पोलिसांनी त्यांची चार तास चौकशी केली होती. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुजरातमधील ओरेवा या घड्याळ बनवणाऱ्या कंपनीसोबत झालेल्या कराराबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्या बैठकीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांच्या वतीने अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. हा अपघात कसा झाला याचे कारणही शोधा असे निर्देशही त्यांनी दिले होते.
30 ऑक्टोबर रोजी झालेल्या पूल दुर्घटनेनंतर गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेले बचावकार्य गुरुवारी रात्री थांबवण्यात आले. बचाव कार्यात सहभागी असलेले मदत आणि बचाव अधिकारी हर्षद पटेल यांच्या मते, आता अशी कोणतीही व्यक्ती उरलेली नाही, जी बेपत्ता आहे आणि त्याचा अहवाल पूल दुर्घटनेनंतर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व तपास यंत्रणांशी चर्चा करून बचावकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community