एलॉन मस्कने पुन्हा ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी असे वाटले की, आपले नशीब बदलेल पण मस्क यांनी ट्विटरची मालकी घेताच नशीब पालण्याऐवजी त्यांचे नशीबच फिरले. ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस खूपच अनपेक्षित होता. कारण एलॉन मस्क यांनी कंपनीतून कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे निश्चित केल्यानंतर आता कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ईमेल्सही पाठवले जात आहेत. इतकेच नाही तर ऑफिसला येत असाल तर घरी परत जा आणि मेलची वाट पाहा, असेही ट्विटरने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.
(हेही वाचा – ट्विटरच्या ३७०० कर्मचाऱ्यांना बसणार झटका! काय आहे इलॉन मस्क यांची नवी योजना?)
ट्विटरने निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण ३७०० कर्मचाऱ्यांनी घरी बसवले जाणार आहे आणि आजपासूनच ही मोहीम कंपनीकडून सुरू करण्यात येणार असल्याने ट्विटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भिती अधिक वाढली आहे. एलॉन मस्क यांनी टॉपच्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर आता कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. मस्क यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर होणारा खर्च एक डॉलरपर्यंत कमी करण्याचा आदेश दिला आहे.
काय म्हटले मेलमध्ये…
“ट्विटरला आणखी कार्यक्षम करण्याच्या प्रयत्नात, आम्ही शुक्रवारी जागतिक पातळीवर कर्मचारी कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जाणार आहोत. आम्हाला माहित आहे की याचा परिणाम अनेक व्यक्तींवर होणार आहे. ज्यांनी ट्विटरवर अमूल्य योगदान दिले आहे, परंतु कंपनीच्या दृष्टीने ही कृती दुर्दैवाने आवश्यक आहे. आमच्या कर्मचार्यांचे स्वरूप आणि प्रभावित व्यक्तींना शक्य तितक्या लवकर माहिती देण्याची आमची इच्छा आहे. ही प्रक्रिया मेलद्वारे पार पडत असून शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत प्रत्येकाला वैयक्तिक ईमेल पाठवण्यात येणार आहे. “
“तुमच्या रोजगारावर परिणाम होत नसल्यास, तुम्हाला तुमच्या ट्विटर ईमेलद्वारे सूचना देण्यात येईल. तुमच्या रोजगारावर परिणाम झाला असल्यास, तुम्हाला तुमच्या वैयक्तिक ईमेलद्वारे सूचना देण्यात येईल. प्रत्येक कर्मचाऱ्याची तसेच ट्विटर प्रणाली आणि ग्राहक डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत करण्यासाठी, आमची कार्यालये तात्पुरती बंद केली जाणार आहे. तुम्ही ऑफिसमध्ये येत असाल तर कृपया घरी परत जा”, असे मेलद्वारे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community“By 9AM PST on Friday Nov. 4th, everyone will receive an individual email with the subject line: Your Role at Twitter.” pic.twitter.com/htPIOy86pe
— Benny Johnson (@bennyjohnson) November 4, 2022