राज्यातील एसटीचे कर्मचारी ३४ टक्के महागाई भत्त्यापासून अद्याप वंचित आहेत. हा महागाई भत्ता मिळावा यासाठीचा प्रस्ताव गेले दोन महिने शासनाकडे आहे. यावर निर्णय झालेला नाही. नोव्हेंबर महिन्यात वेतनात हा भत्ता मिळावा अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. सध्या एसटी महामंडळ तोट्यात असल्याने राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीतून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे.
( हेही वाचा : 7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! १८ महिन्यांची DA थकबाकी लवकरच मिळणार?)
ताफ्यात दाखल होणार ९०० मिडी वातानुकूलित बस
एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित २ हजार बस दाखल होणार आहेत. यापैकी सुमारे ९०० मिडी बस वातानुकूलित असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. या नव्या बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. यावेळी सीएनजी वाहनांऐवजी २ हजार डिझेलवर धावणाऱ्या आणि २ हजार विजेवर धावणाऱ्या बस घेण्याचा प्रस्ताव महामंडळ आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडला जाणार आहे. या नव्या मिडी बस १२ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. वातानुकूलित मिडी बसची प्रवासी क्षमता ३२ आसनी असणार आहे.
या मिडी बसचे भाडे प्रवाशांना परवडणारे असेल आणि इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल.
Join Our WhatsApp Community