भाजपापेक्षा निम्मे आमदार असूनही मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी, मी २०२४ मध्ये मुख्यमंत्री होईन का, ते सांगता येणार नाही, असे विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. शिंदे म्हणाले, आरोपांचे उत्तर मी कामातून देईल. मी २०२४ मध्ये मुख्यमंत्री होईन का ते सांगता येत नाही. ते लोक ठरवतील. मी इथे राज्याच्या विकासासाठी वचनबद्ध आहे, माझी संपत्ती वाढविण्यासाठी आलेलो नाही.
आमचे ‘प्रो पिपल , प्रो डेव्हलपमेंट’ सरकार असेल. आम्ही तीन महिन्यात बरेच चांगले निर्णय घेतले. पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत केली आहे. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. आज राज्यात आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करतो आहोत.
हे जनतेचे सरकार आहे. मी आजही सामान्य माणूस आहे. अडीच वर्षे सगळे बंद होते. आम्ही ते खुले केले. आमची अर्थव्यवस्था सुधारते आहे. लोक रस्त्यावर आनंदाने फिरताहेत. मला सांगा दोन तीन महिन्यात असे मोठमोठे प्रकल्प येतात किंवा जातात का? मी अनिल अग्रवाल यांच्याशी स्वतः बोललो. त्यांनी सांगितले की त्यांना पूर्वीच्या सरकारकडून सहकार्य मिळाले नाही. मी प्रधानमंत्र्यांशीही चर्चा केली. महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प देऊ, चिंता करू नका, असे त्यांनी सांगितल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

( हेही वाचा: Mumbai Traffic Update: अंधेरीतील ‘हा’ ब्रीज दोन वर्षांसाठी राहणार बंद )
पूर्वीच्या सरकारने अठरा महीने उद्योगाच्या हाय पॉवर कमिटीची मीटिंग घेतली नाही. नुसते करार करून चालणार नाहीत; त्यांची अंमलबजावणीही व्हायला हवी. प्रकल्प गेला त्याचे आम्हालादेखील दुःख आहे. आज ठाणे, रायगड, संभाजीनगर येथे उद्योग येत आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.