भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या खेळाडूची क्रेझ केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत विराटने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये ३ अर्धशतके केली आहेत. दरम्यान, चाहत्यांचा लाडका किंग कोहली शनिवारी आपला ३४ वा वाढदिवस साजरा करणार आहे.
( हेही वाचा : विराट कोहलीने जिंकले सर्वांचे मन; भारताच्या विजयानंतर बांगलादेशच्या हॉलमध्ये गेला अन् घडले असे… )
विराटचा जन्म ५ नोव्हेंबर १९८७ साली दिल्लीमध्ये झाला. त्याचे शिक्षण दिल्लीच्या विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये झाले. १२ वी पर्यंतचे शिक्षण घेऊन विराटने आपले संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले. १८ ऑगस्ट २००८ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी त्याचा पहिला कसोटी सामना खेळला. तसेच विराट नेतृत्त्वात भारताने अंडर १९ चा वर्ल्डकप सुद्धा जिंकला आहे. यानंतर विराटने काही कालावधीसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद भुषवले. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत स्वत:च्या नावावर अनेक विक्रमांची नोंद केली आहे.
म्हणून घालतो १८ क्रमांकाची जर्सी
विराटच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे भारताचा हा लाडका खेळाडू फक्त १८ क्रमांकाची जर्सी घालतो. यामागे विशेष कारण आणि खूपच भावनिक कारण आहे, विराटच्या वडिलांचे १८ नोव्हेंबर २००६ मध्ये निधन झाले तेव्हा विराट मॅच खेळत होता. त्यामुळे तेव्हापासून विराट कायम वडिलांच्या आठवणीत ही १८ क्रमांकाची जर्सी घालतो.
संपूर्ण भारतात One8 Commune ची रेस्टॉरंटची साखळी करणार
One8 Commune हा विराटचा स्वत:चा ब्रॅंड आहे. One8 Commune या नावाने भारतात दिल्लीमध्ये पहिले रेस्टॉरंट विराटने सुरू केले दिल्लीनंतर आता मुंबईत जुहू परिसरात विराटचे One8 Commune हे रेस्टॉरंट सुरू झाले आहे. यामध्ये विराट कोहलीचा वेगळा Vegan मेन्यू सुद्धा डिझाईन करण्यात आला आहे. १८ क्रमांकाशी खास नाते असल्यामुळेच विराटने स्वत:च्या ब्रॅंडच्या नावात सुद्धा या क्रमांकाला स्पेशल स्थान दिले आहे. भविष्यात काही शहरांत हे रेस्टॉरंट सुरू होणार आहे.
Join Our WhatsApp Community