इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. हा बोर्डाकडून घेण्यात आलेला महत्त्वाचा निर्णय असून यानुसार आता दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर असणार आहे. तर बारावी बोर्डासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असणार आहे.
(हेही वाचा – कोरोनाचा शाळांनाही बसला फटका, 20 हजारांहून अधिक शाळांना लागले कुलूप)
दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरता १० नोव्हेंबर अशी मुदत होती, जी आता वाढवून २५ नोव्हेंबर अशी करण्यात आली आहे. तर बारावी बोर्डाच्या परीक्षेचे आवेदन पत्र विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहेत. तर बारावी बोर्ड परीक्षेसाठी यापूर्वीची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत होती. यामध्ये वाढ करण्यात आली असून बारावीच्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज सादर करता येणार आहे.
१०वी, १२वीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक याआधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, बारावी बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. हे संभाव्य वेळापत्रक असून बोर्डाकडून निश्चित वेळापत्रक येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.