Virat Kohli Birthday : कोहलीचे टॉप ५ ‘विराट’ विक्रम; बरोबरी करणे अशक्य

162

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ५ नोव्हेंबरला आपला ३४ वा वाढदिवस ऑस्ट्रेलियामध्ये साजरा करणार आहे. विराट कोहलीने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. कोहलीने केलेले विराट विक्रम कोणते आहेत पाहूयात…

( हेही वाचा : विराट कोहलीने जिंकले सर्वांचे मन; भारताच्या विजयानंतर बांगलादेशच्या हॉलमध्ये गेला अन् घडले असे…)

१. सर्वाधिक द्विशतके

टीम इंडियाचा रन मशिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. त्याने भारतासाठी कसोटीत सर्वाधिक द्विशतके झळकावली आहेत. कोहलीच्या नावावर कसोटीत 7 द्विशतके आहेत.

२. सर्वाधिक शतके करणारा दुसरा खेळाडू

विराट कोहलीने आपल्या जवळपास 15 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले. सर्वाधित शतके करणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. अलीकडेच त्याने अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले.

३. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार

कर्णधार म्हणून त्याने 20 कसोटी शतके झळकावली आहेत. कोहली टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने यामध्ये गांगुली आणि धोनीला मागे टाकले आहे. विराटने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, ज्यामध्ये टीम इंडियाने 40 सामने जिंकले आहेत.

४. कर्णधारपदाच्या पदार्पणात शतक

२०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीने पहिल्यांदा भारताचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्यावेळी नियमित कर्णधार धोनी दुखापतीमुळे संघाबाहेर होता. कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा विराट कोहली हा जगातील दुसरा क्रिकेटपटू आहे. या विक्रमाद्वारे त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपलची बरोबरी केली.

५. तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-१ बनणारा एकमेव भारतीय

विराट कोहली हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे जो ICC च्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर 1 फलंदाज राहिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.