ठाणे जिल्ह्यातील व्याघ्र गणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रादेशिक भाग तसेच अभयारण्यात यंदा 10 नोव्हेंबरपासून व्याघ्र गणनेला सुरुवात होणार आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ताडोबात व्याघ्र गणनेदरम्यान स्वाती ढुमरे या महिला वनरक्षकाचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर व्याघ्र गणना तातडीने थांबवण्यात आली होती.
( हेही वाचा : परिवहन मंत्र्यांऐवजी अध्यक्ष सांभाळणार ‘एसटी’ महामंडळाचा कारभार?)
ताडोबा येथील घटनेनंतर एक नोव्हेंबरपासून राज्यातील विविध भागात व्याघ्रगणना सुरु झाली होती. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने व्याघ्र गणना सुरु झाली. त्यानंतर राज्यात इतर भागातही टप्प्याटप्प्याने व्याघ्र गणना सुरु केली जाईल, असे वनाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र ठाणे जिल्ह्यातील व्याघ्र गणनेला दरवेळीप्रमाणे जानेवारी महिन्यात सुरुवात होईल, अशी शक्यता होती. त्यात पावसामुळे जंगलात बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याने व्याघ्र गणनेशी संबंधित ट्रानझिट लाईन टाकताना अडचणीचा सामना करावा लागेल, असाही मुद्दा उपस्थित होत होता. अखेरीस दहा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान ठाणे जिल्ह्यात व्याघ्र गणना घेतली जाईल, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील सर्व भागात व्याघ्र गणना कधी सुरु होईल, याबाबतची माहिती मात्र वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून मिळाली नाही.
Join Our WhatsApp Community