गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी गुरुवारी रात्री विशेष पथकाला पाठवून शहरातील बाराभाई गल्लीतील कत्तलखान्यावर छापा मारला. यावेळी कत्तलीसाठी आणलेल्या 66 गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केल्याने त्यांचा जीव वाचला आहे. पोलिसांनी 12 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन सहा जणांवर गुन्हा नोंदवला.
( हेही वाचा: नवाब मलिकांना मोठा धक्का; ED जप्त करणार संपत्ती ? )
तब्बल 66 गोवंशीय जनावरांची केली सुटका
अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्लीतील नगर परिषदेच्या गाळ्यातील कत्तलखान्यातून चोरीछुपे नियमित अनेक गोवंशीय जनावरांची कत्तल केली जाते. गुरुवारीदेखील या ठिकाणी कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरे आणल्याची गुप्त माहिती अपर अधीक्षक कविता नेरकर यांनी मिळाली होती. सदर माहिती गांभीर्याने घेत, नेरकर यांनी त्यांच्या विशेष पथकातील एपीआय रवींद्र शिंदे, पोलीस कर्मचारी तिकडे, दौंड, तागड, देवकते, सुरवसे, महिला कर्मचारी राठोड, गायकवाड यांच्यासह रात्री 10:30 वाजता तातडीने बाराभाई गल्लीत पाठवून कत्तलखान्यावर छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या तब्बल 66 गोवंशीय जनावरांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी एका पिकअप टेम्पोसह एकूण 12 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळी आढळून आलेल्या फय्याज अब्दुल करीम कुरेशी, अमीर मौला कुरेशी, लायक कुरेशी, मुक्तरा कुरेशी, फारुक कुरेशी आणि दिशान हाफिज या सहा जणावंर गुन्हा नोंदवण्यात आला.
Join Our WhatsApp Community