बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पन्नास लाखांची लाच स्वीकारताना आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या रकमेची लाच घेतल्याने, पालिका अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची हद्दच मोडली आहे. सर्वसामान्यांसाठी 50लाख रकमेचा हा आकडा धक्कादायक आहे.
सतीश पोवार हे महापालिकेच्या अंधेरी येथील के-पूर्व प्रभागात कार्यरत आहेत. ते कार्यकारी अभियंता आहेत. त्यांच्या कार्यालयाने व्यावसायिक इमारतीतील बेकायदा बांधकामाविरोधात नोटीस दिली होती. ज्याच्या अंमलबजावणीसाठी पालिकेचे कर्मचारी गेले होते. ही कारवाई थांबवण्याच्या बदल्यात अधिकाऱ्याने पन्नास लाख रुपये मागितले होते. हीच लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सतीश पोवार यांना अटक केली.
( हेही वाचा: मोठी बातमी! काॅंग्रेसचे 22 आमदार फुटणार, ठाकरे गटाचे नेते खैरे यांचा दावा )
Join Our WhatsApp Community