शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असताना यासंदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील
आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली असती, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो, तशी ती वेळ होती, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला. अधिवेशन संपलाय पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे सांगितले जात आहे. मात्र आमचं सरकार मजबूत आहे. राहिलेला दोन वर्षाचा कार्यकाळ शिंदे सरकार पूर्ण करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – मुंबईतील ‘हा’ ब्रीज 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद, ‘या’ पर्यायी मार्गाचा करा वापर)
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दावा केला की, राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरवायचा बाकी आहे, याबाबतही प्रतिक्रिया देताना गुलाबराब पाटील म्हणाले, यापूर्वीच हा प्रयोग झाला आहे. शिंदे सरकारने जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली असती.
Join Our WhatsApp Community