BMC निवडणुकीसाठी ‘भाजपा’ने कंबर कसली! ‘मातोश्री’च्या अंगणात ‘जागर…’

भाजपाच्या "जागर मुंबईचा" मोहिमेला उद्या वांद्रे पूर्व पासून सुरुवात

138

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय गणितं बदल्याचे दिसून आले आहे. सध्या शिंदे गट-भाजपा यांच्यात युती आहे. अशातच भाजपने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. पालिकेत विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून जागर मुंबईचा या विशेष अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपची पहिली जाहीर सभा भाजप नेते आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पूर्वमध्ये होणार आहे. भाजपाचे नेते तथा भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपाच्या या विशेष मोहिमेबद्दल माहिती दिली आहे.

(हेही वाचा – मुंबईतील ‘हा’ ब्रीज 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद, ‘या’ पर्यायी मार्गाचा करा वापर)

‘मतांसाठी तुष्टीकरण सुरू आहे. महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. औरंगजेबी स्वप्न पाहणाऱ्यांची भलती ‘उठा’ठेव सुरु आहे. त्याविरोधात भाजपाकडून मुंबईकरांसाठी ‘जागर मुंबईचा’ ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेतील पहिली सभा ही ६ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वांद्रे पूर्व येथे आयोजित करण्यात येणार आहे,’ असे आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे सांगितले आहे.

मुंबईची शांतता धोक्यात आणून मुंबई महापालिका निवडणूकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. एका विशिष्ट वर्गाचे तुष्टीकरण केले जात आहे, असा आरोप करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली “जागर मुंबईचा” हे अभियान घोषित केले आहे. याची सुरुवात उद्या 6 नोव्हेंबरपासून होते आहे. या जागर यात्रेचे प्रमुख आमदार अतुल भातखळकर असून हे अभिमान राजकीय भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

उद्या, रविवारी वांद्रे पूर्व येथे गव्हर्नमेंट काँलनीतील पी. डब्ल्यू. डी मैदानात संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. खासदार पुनम महाजन आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार हे प्रमुख वक्ते म्हणून या सभेत संबोधित करणार आहेत. आमदार अँड पराग अळवणी यांच्यासह मुंबईचे पदाधिकारी यावेळी उपस्थितीत राहणार आहेत. त्यानंतर 7 नोव्हेंबरला गोंदिवली अंधेरी पूर्व येथे सभा होणार असून विशेष म्हणजे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी लागताच दुसऱ्याच दिवशी याच मतदार संघात भाजपाने सभा ठेवली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.