राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांची शक्यता उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत वर्तवली. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश या बैठकीत दिले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही याला दुजोरा दिला. त्यामुळे भाजपचे नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चक्क जयंत पाटलांना आव्हान दिले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने आज दिवसभर राजकीय पातळीवर जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला दुजोरा देत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहेत, न्यायालयात जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला, तर सरकार अडचणीत सापडेल, असे सांगितले.
(हेही वाचा ‘दी काश्मीर फाईल्स’नंतर आता ‘द केरला स्टोरी’, आयसिसने तस्करी केलेल्या ३२ हजार हिंदू महिलांची कथा)
काय म्हणाले मुनगंटीवार?
त्यावर भाजपचे नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार पुढच्या तीन महिन्यांत पाडून दाखवावे, तसे जर झाले तर मी पुढची निवडणूक लढवणार नाही आणि जर तसे झाले नाही तर जयंत पाटील यांनी पुढची निवडणूक लढऊ नये, असे आव्हान दिले. त्यांनतर मात्र जयंत पाटील यांनी ‘आपण सरकार पडेल’, असे म्हटले नव्हते, असा खुलासा केला.
Join Our WhatsApp Community