अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु या निवडणुकीत नोटाचेही मतदान अधिक झाल्याची शक्यता वर्तवली जात असून खुद्द शिवसेनेच्या नेत्यांनीही भाजपने नोटाला मतदान करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे लटके यांच्यापेक्षा नोटाच्या मतांचे प्रमाण अधिक असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तसे झाल्यास नक्की काय निर्णय लागेल, असा प्रश्न शिवसैनिकांसह सर्वांच्याच मनात निर्माण होऊ लागल्या आहेत.
रविवारी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रविवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे रविवारी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार असली तरी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटाच्या मतांचे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जात आहे. खुद्द शिवसेनेकडूनही नोटाचीच अधिक मते झाल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेनेला खऱ्या अर्थाने आता नोटाची भीती मतदान प्रक्रियेनंतरही वाटू लागली आहे.
(हेही वाचा ‘दी काश्मीर फाईल्स’नंतर आता ‘द केरला स्टोरी’, आयसिसने तस्करी केलेल्या ३२ हजार हिंदू महिलांची कथा)
काय आहे नोटाचा नियम?
मात्र, उमेदवारापेक्षा नोटाचे मतदान अधिक झाल्यास काय निर्णय घेतला जावू शकतो याबाबत शिवसैनिकांसह जनतेलाही प्रश्न पडला आहे. त्यामुळे उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मते पडल्यास आजवरच्या निवडणूक प्रक्रियेतील देशातील ही पहिली घटना ठरणार आहे. मात्र, आजवर अशाप्रकारची कधीही घटना न घडल्याने याबाबतचा अशा प्रकारचा विचार करावा लागला नाही. परंतु जरी नोटाचे मतदान अधिक झाले तरी त्याचा परिणाम उमेदवाराच्या विजयावर होत नाही. नोटाला जास्त मतदान झाले आणि त्याखालोखाल उमेदवाराला मतदान झाले असले तरी सर्वाधिक मतदान झालेला उमेदवारच विजयी घोषित होतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community