जगभर दया-क्षमा-शांतीचे ठेकेदार बनलेल्या प्रभु येशूच्या नावाने ख्रिश्चनांनी अमर्याद पापे केली आहेत. तसे, ख्रिश्चन धर्म असेही म्हणतो की तुम्ही कितीही चांगली लोकहिताची कामे केलीत, पण जर तुम्ही प्रभु येशूच्या आश्रयाला आला नाही तर तुम्ही पापी राहाल आणि तुम्हाला ‘नरकाच्या’ आगीत जळावे लागेल. परंतु ज्या क्षणी तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि प्रभु येशूला तुमचा तारणहार म्हणून स्वीकारले, त्या क्षणी तुमच्या सर्व पापांची क्षमा होईल. येशु तुमच्या पापांची शिक्षा भोगेल. याच कारणामुळे चर्च व चर्चकडून चालवल्या जाणाऱ्या शाळा, केंद्रे, अनाथालय, निवासी ठिकाणे, इथे पाद्री कुठलीही भीती आणि नैतिकता न बाळगता लैंगिक अत्याचारासारखे गैरकृत्य करतात.
‘अमेन – ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन’ पुस्तकातून पर्दाफाश
केवळ क्षमा मागून लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांचे दुःख संपणार नाही. केरळ राज्यातील विशेष फ्रँको मुलककल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. लैंगिक शोषण झालेल्या बिशपची जामिनावर सुटका झाल्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले आणि ज्या ननवर बलात्कार झाला होता, तिला ताबडतोब चर्चमधून काढून टाकण्यात आले. हा न्याय आहे का? याच केरळ राज्यात सिस्टर जेसमे यांनी ‘अमेन – ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन’ हे पुस्तक लिहून चर्च व धर्मगुरूंच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश केला आहे, पण ही मंडळी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. चर्चच्या पाठिंब्याने चालवल्या जाणाऱ्या शाळा आणि नवी मुंबईतील अनाथालयातही बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. पोलिसही मुळापर्यंत तपास करत नाहीत. पाद्रीला अटक केल्यानंतर एकाही विश्वस्ताला चौकशीसाठी बोलावले नाही.
(हेही वाचा ‘दी काश्मीर फाईल्स’नंतर आता ‘द केरला स्टोरी’, आयसिसने तस्करी केलेल्या ३२ हजार हिंदू महिलांची कथा)
भारतीय संविधान व कायद्याने शिक्षा व्हायला हवी
चर्चचा कलंकित इतिहास केवळ भारतापुरता मर्यादित नाही. शतकांपूर्वी झालेल्या धर्मयुद्धांपासून ते स्पेन, पोर्तुगाल, मेक्सिको आणि पेरूच्या ‘इनक्वझिशन’ पर्यंत, स्त्रियांना ‘चेटकीण’ म्हणून जिवंत जाळणे आणि ज्यंसारख्या गैर-ख्रिश्चनांच्या हत्येच्या घटना घडलेल्या आहेत. अंदाजे आकडेवारीनुसार, १४५०-१७५० च्या दरम्यान चर्चच्या सूचनेनुसार एक दशलक्षाहून अधिक स्त्रियांना चेटकीण घोषित करून मृत्यूदंड देण्यात आला. २५ डिसेंबर १९८१ रोजी पोलंडमधील वॉर्सा येथे १२ ज्यूंची निर्घृण हत्या करण्यात आली. अनेक महिलांवर बलात्कारही करण्यात आला. मार्च २००० मध्ये, तत्कालीन पोप, दिवंगत जॉन पॉल २ यांनी वैयक्तिक गुन्हेगाराचा संदर्भ, किंवा नाव न घेता, चर्चेने केलेल्या ‘पापांसाठी’ क्षमा मागितली. काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये चर्चेने उभारलेल्या दोन निवासी शाळांमध्ये एक हजार मुलांना दफन केल्याचे आढळून आले होते. अशा अनेक शाळांद्वारे (१८७६-१९९६), लाखो मूळ कॅनेडियन लोकांचे ख्रिश्चनीकरण करण्यात आले ऐतिहासिक चुकांबद्दल रोमन कैथोलिक चर्चने पश्चात्ताप करणे किंवा माफी मागणे नवीन नाही. २००८ मध्ये तत्कालीन पोप बेनेडिक्ट १६, त्यानंतर सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी २०१८ मध्ये जाहीर माफी मागितली होती. आता फक्त माफी मागून चालणार नाही. चर्चमध्ये दिल्या जाणाऱ्या ‘कन्फेशन’चा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या फादर, पाद्री यांना त्यांचा येशु कधी शिक्षा देणार माहीत नाही, पण भारतीय संविधान व कायद्याने त्यांना शिक्षा व्हायला हवी.
लेखक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदू जनजागृती समिती
Join Our WhatsApp Community