एकीकडे शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबीर सुरू असताना, दुसरीकडे पवारांचे निष्ठावंत शिंदे गटात दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
आमदार महेश शिंदे आणि सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कोरेगांवचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. अभय तावरे व पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचा विधवा महिलेला कुंकू लावण्याची मोहीम पुरोगामी ठरते, मग विवाहित महिलेला कुंकू लाव म्हटले तर धोक्यात कसे येते?)
कोलवडी विकास सोसायटीचे अध्यक्ष भानुदास भोसले, सुनिल भोसले, माजी सरपंच धनंजय तारळकर, किरण घोरपडे, रामभाऊ निकम, अरविंद तारळकर, महेश चव्हाण, निलेश जाधव, सचिन जाधव, वैभव भोसले, राजेंद्र वायदंडे, आकाश खाडे, अमर भोसले, दिलीप भोसले, सचिन भोसले, संजय भोसले, शरदभाऊ भोसले, सुनिलराव घोरपडे, हनमंतराव जाधव, अविनाश यशवंत मोहिते, राजू साळुंखे, सचिन कणसे, चंदुकाका पवार, अनिल अवचिते, रमेश कलाटे, शांताराम चाटे, अदित्य तावरे, सुनिल धुमाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा त्यात समावेश आहे.
आणखी पक्षप्रवेश होतील!
शिर्डीत एकीकडे राष्ट्रवादीचे मंथन सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे अनेक जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाट धरताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या प्रभावामुळे येत्या काळात मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातर्फे देण्यात आली.
Join Our WhatsApp Community