पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी अलिकडे उच्चांक गाठल्याने आणि पर्यावरणपूरक प्रवास म्हणून नागरिक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देतात. मात्र आता इलेक्ट्रिक गाड्यांचा खप वाढू लागल्यावर त्यातील उणिवांची माहिती सर्वांसमोर येऊ लागली आहे. इलेक्ट्रिक बाईकने पेट घेतल्याच्या घटना अलिकडे वारंवार घडताना दिसतात. यावर आता केंद्रील समितीने सुद्धा अहवाल सादर केला आहे.
( हेही वाचा : मुंबई ते नागपूर फक्त ८ तासात! समृद्धी महामार्गावर प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा)
काय सांगतो केंद्रीय समितीचा अहवाल?
इलेक्ट्रिक गाड्यांना का आग लागते याविषयीचे कारण जाणून घेण्यासाठी केंद्रीय समितीची निर्मिती करण्यात आली होती आता या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार बॅटरी डिझाइन आणि मॉड्यूल तसेत इलेक्ट्रिक स्कूटरच्या संपूर्ण बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिमध्ये गंभीर समस्या आहेत. या समस्यांमुळेच बॅटरी गरम झाल्याने आग लागते. काही मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंमत कमी करण्यासाठी कमी दर्जाचे साहित्या वापरत असल्याचेही या निरीक्षणात केंद्रीय समितीने स्पष्ट केले आहे.
दुर्घटना टाळण्यासाठी…
- गुणवत्तापूर्वक वाहन घ्या.
- योग्य वेळेत चार्जिंग बंद करा.
- इलेक्ट्रिक वाहन सावलीत उभे करा.
- सुसंगत वेगाने गाडी चालवा.
- नियमित सर्व्हिसिंग करा.
- गाडी रात्रभर चार्जिंगला लावू नका.