गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार? केजरीवालांनी कागदावर दिले लिहून

144

गुजरात विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले असून या निवडणुकीच्या प्रचारासाठी आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. पंजाबमध्ये सत्तापालट केल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळणा-या जागांबाबत मोठे भाकीत केले आहे.

कागदावर दिले लिहून

काँग्रेसला सध्या कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाच पेक्षाही कमी जागा मिळतील, असे केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कागदावर लिहून दिले आहे. केजरीवाल यांनी केलेल्या या विधानामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

(हेही वाचाः ‘जर भाजपने ही निवडणूक लढवली असती तर…’,पोटनिवडणुकीतील विजयानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं)

‘आप’चा भाजपला फायदा होणार?

दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत भोपळाही न फोडता आलेल्या आपने यंदा गुजरात विधानसभा निवडणूक गाजवण्याचे ठरवले आहे. पण आपमुळे काँग्रेसचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आपमुळे काँग्रेसची मतं फुटणार असून त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचे बोलले जात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये प्रचंड पैसा खर्च केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या निवडणुकीसाठी भाजप केजरीवाल यांच्या पक्षाचे उमेदवार ठरवत असल्याचा दावाही काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.