केंद्र सरकार बदलणार SIM Card खरेदीचे नियम? ‘ही’ कागदपत्रे आवश्यक असणार

169

मोबाईलमधील सिम कार्ड घेताना ग्राहकांना विशिष्ट कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. पण अनेकदा बनावट माहितीच्या आधारे सिम कार्ड खरेदी करुन त्याचा गैरवापर देखील करण्यात येतो. त्यामुळे ही फसवणूक रोखण्यासाठी आता केंद्रे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठीचे नियम सरकार बदलणार असल्याची माहिती मिळत आहे.

5 कागदपत्रं आवश्यक असणार?

सध्या सिम कार्ड हवे असल्यास ग्राहकांना विविध 21 कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र दाखवून नवीन सिम कार्ड घेता येत होते. पण आता हीच 21 कागदपत्रांची मर्यादा केंद्र सरकारकडून 5 कागदपत्रांवर आणली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कागदपत्रांची मर्यादा कमी करण्याच्या तयारीत

मतदार कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स,पॅन कार्ड,आधार कार्ड,रेशन कार्ड,पेन्शनर कार्ड,लोकप्रतिनिधींचे पत्र,स्वातंत्र्य सैनिक कार्ड,किसान पासबूक यांपैकी कुठल्याही एका कागदपत्राच्या माध्यमातून सध्या ग्राहक सिम कार्ड खरेदी करू शकतात. पण आता सरकार ही मर्यादा कमी करण्याच्या विचारात आहे.

आता केवळ आधार कार्ड,मतदार कार्ड,पासपोर्ट,रेशन कार्ड आणि वीज बिल या कागदपत्रांच्या आधारेच सिम कार्ड देण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत हा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.