मुंबईत किमान तापमान रविवारी १९.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. किमान तापमान कमी झाल्याने रविवारी कमाल तापमानही काही अंशाने कमी झाले. कमाल तापमान ३६.६वरुन रविवारी ३६.१ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. मात्र येत्या दिवसांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३५ अंशावर येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईत तापमानात फरक
नोव्हेंबर महिना सुरू असताना आता डहाणूनंतर मुंबईचे किमान तापमान खाली सरकल्याने रविवारी मुंबईतील थंडीत वाढ दिसून आल्याचे जाणवत होते. मुंबईतील सांताक्रूझ केंद्रात किमान तापमानात घट नोंदवली गेली. त्यातुलनेत कुलाबा केंद्रात किमान तापमान खाली सरकले नव्हते. रविवारी मुंबईतील कुलाबा येथील किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस होते. दोन्ही केंद्रातील किमान तापमानात चार अंशांचा फरक होता.
(हेही वाचाः देशात पहिल्यांदाच होतेय वाघांचे स्थलांतर? अखेरच्या टप्प्यात होतोय हा मोठा बदल)
दोन्ही स्थानकांत किमान तापमानात फरक असताना शहर परिसरात फारशी थंडी जाणवली नव्हती. दिवस सरल्यानंतर सायंकाळी सांताक्रूझ केंद्रातील कमाल तापमानावरही किमान तापमान कमी झाल्याचा फरक जाणवला. सांताक्रूझ केंद्रात कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र कुलाब्यात किमान तापमान खाली सरकलेले नसले, तरीही कमाल तापमान कमी झाले.
कोकण पट्ट्यात थंडी
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला डहाणू, ठाण्यात किमान तापमान खाली सरकू लागले होते. मुंबईत पहिल्यांदाच रविवारी किमान तापमान १९.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. २०२० नंतर पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यातील मुंबईतील किमान तापमान कमी नोंदवले गेले. कोकण पट्ट्यात थंडी डहाणू, ठाणेनंतर आता मुंबईत जाणवू लागली आहे. रविवारची मुंबईकरांची सकाळ अलगद थंडीचा स्पर्श करणारी होती. मात्र, मुंबईतील दोन्ही स्थानकांतील किमान तापमानात चार अंशांचा फरक नोंदवला गेला.
कुलाबा येथील किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझमधील १९.६ अंश सेल्सिअस एवढा फरक होता. कुलाब्यात किमान आणि कमाल तापमानात मात्र बराच फरक होता. कुलाब्यात कमाल तापमन ३४.८ अंश सेल्सिअसवर नोंदवले होते. त्यामुळे शहर व उपनगरातून प्रवास करताना थंडीचा अनुभव दोन्ही ठिकाणी वेगवेगळा जाणवत होता.
Join Our WhatsApp Community