चंद्र आणि मंगळ मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो आता शुक्राचा अभ्यास करण्याची योजना आखत आहे. इस्त्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये चांद्रयान-3 अंतराळात पाठवले जाईल. हे यान चंद्रावरील गडद सावलीचा अभ्यास करेल. यासाठी इस्त्रो जपानी एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) ची मदत घेणार आहे. तर, चांद्रयान-3 नंतर, इस्त्रोचे पुढील मिशन शुक्रावर यान पाठवणे आहे. यामध्ये देखील भारत जपानची मदत घेणार आहे.
नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फाॅर स्पेस अॅंड अलाईड सायन्सचे डाॅक्टर अनिल भारद्वाज म्हणाले की, आदित्य एल-1 आणि चांद्रयान-3 या मोहिमा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्राधान्याने हाती घेतल्या जातील. JAXA सोबत शुक्र ग्रह आणि चंद्रावर मोहिमेची शक्यता आहे. चांद्रयान-3 चे यश लक्षणीय होते. तसेच, ते पुन्हा JAXA सोबत मिशनमध्ये वापरले जाणार आहे.
( हेही वाचा: अमेरिकेला धक्का; रशियन तेलाची सर्वाधिक खरेदी )
सुर्याचा अभ्यास करण्यासाठी मिशन आदित्य एल-1
डाॅक्टर अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 मिशन सुरु करण्यात आले आहे. हे एक अनोखे मिशन असेल. पेलोड वाहून नेणारा 400 किलोचा उपग्रह सूर्याभोवती एका कक्षेत अशाप्रकारे ठेवला जाईल की, तो एका निर्धारित बिंदूपासून ता-यांचे सतत निरिक्षण करु शकेल. आदित्य एल-1 ची कक्षा पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किमी दूर असेल. हे कोरोनल हिटिंग, सोलर विंड आणि कोरोनल मास इंजेक्शन याविषयी माहिती गोळा करेल.
Join Our WhatsApp Community