टी-20 विश्वचषकात (T-20 World Cup) सुर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) चांगली कामगिरी करत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका मालिकेतसुद्धा जोरदार फटकेबाजी केली होती. विश्वचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून सुर्यकुमार यादवने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. जगभरातल्या क्रिकेटच्या चाहत्यांंनी सुर्यकुमार यादवचे कौतुक केले आहे. रविवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये अर्धशतकी पारी खेळल्यानंतर सुर्यकुमारने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सुर्यकुमार यादवने (SKY) मागच्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी केली आहे. त्याने रविवारी झालेल्या मॅचमध्ये 24 चेंडूत 61 धाव्या केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. सुर्याकुमारची बॅटिंग पाहून वसिम अक्रमसुद्धा घाबरला आहे. तो म्हणतो गोलंदाजांना सुर्याला नेमका बाॅल कुठे टाकावा? असा प्रश्न पडत असेल.
( हेही वाचा: T-20 World Cup: भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय! भारत-पाकिस्तानमध्ये अंतिम सामना रंगण्याची शक्यता )
.@imVkohli approves 👌 👌#TeamIndia | @surya_14kumar | #T20WorldCup | #INDvZIM pic.twitter.com/2aFdGaqct7
— BCCI (@BCCI) November 6, 2022
BCCI देखील विराटशी सहमत
रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाने मॅच जिंकल्यानंतर सुर्यकुमार यादवने काही फोटो कॅप्शनसह सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये “निळ्या रंगात रंगण्यासारखे दुसरे काही नाही” असे लिहिले आहे. त्यावर विराट कोहलीने “अलग लेव्हल” अशी कमेंट केली आहे. BCCI ने या चॅटचा स्क्रीटशाॅट शेअर करत आम्हाला विराटचे म्हणणे मान्य असल्याचे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community