पालघरमध्ये दोन MSRTC बसेस समोरासमोर धडकल्या अन्…, २५ जण जखमी

150

पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील जव्हार-सिल्वासा रस्त्यावरील जयसागर धरणाजवळ सोमवारी सकाळी दोन एसटी महामंडळाच्या (राज्य परिवहन महामंडळ) बसेसची समोरासमोर धडक झाली. झालेल्या या जोरदार धडकेत एकूण २५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना पतंगशाह कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नाशिकहून सिल्वासाकडे जाणारी एसटी बस आणि जळगावहून सिल्वासाकडे जाणारी एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणीही मृत पावले नाही, परंतु 25 जण जखमी झाले आहेत. जव्हार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.

घडलेल्या घटनेनंतर दोन्ही बसेस घटनास्थळी सोडून त्या बसेसमधील प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही बसमध्ये किती प्रवासी होते, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. जखमींना तातडीने जव्हार येथील पतंगशाह कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.