टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने प्रवेश केला आहे. त्यामुळे भारत 15 वर्षांनी पुन्हा एकदा टी-20 विश्वचषक जिंकेल, अशी आशा सर्व भारतीयांना आहे. या विश्वचषकात विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ग्रुप स्टेजवरील सामन्यांत कोहलीने चांगली कामगिरी करत, सर्वाधिक 246 धावा केल्या आहेत.
त्यामुळे विराट कोहली हा या विश्वचषकातील आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. त्यामुळे ICC ने उपांत्य फेरीआधीच विराटचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
(हेही वाचाः T-20 World Cup: भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय! भारत-पाकिस्तानमध्ये अंतिम सामना रंगण्याची शक्यता)
विराटचा गौरव
आयसीसीने ICC Men’s Player of the Month हा पुरस्कार देऊन विराटला सन्मानित केले आहे. ऑक्टोबर महिन्यातील कामगिरीसाठी विराटला हा पुरस्कार देण्यात आला आहे. याआधी रिषभ पंत, आर.अश्विन,भुवनेश्वर कुमार,श्रेयस अय्यर यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Congratulations to @imVkohli – ICC Player of the Month for October 👏👏#TeamIndia pic.twitter.com/IEnlciVt9T
— BCCI (@BCCI) November 7, 2022
सहका-यांना पुरस्कार समर्पित
आयसीसीकडून मिळालेला हा पुरस्कार मी माझी सन्मान समजतो. त्यासाठी जगभरातील चाहत्यांचे आणि पॅनल सदस्यांचे मी आभार मानतो. हा पुरस्कार मी या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या अन्य सदस्यांना आणि माझे सहतारी खेळाडू,सपोर्ट स्टाफ यांना समर्पित करतो, असे विराट कोहलीने यावेळी म्हटले आहे. दरम्यान, विराटने 5 सामन्यांत 246 धावा करत टी-20 विश्वचषकात सर्वोत्तम फलंदाज होण्याचा मानही मिळवला आहे.
भारताने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत समावेश केला असून, 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि ग्रुप-1 मधील दुस-या स्थानी असलेल्या इंग्लंडमध्ये उपांत्य फेरीची लढत होणार आहे.
Join Our WhatsApp Community