कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यांनी राडा केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तारांच्या शासकीय निवास्थानाच्या काचा देखील फोडल्या. यासह जोरदार दगडफेक करत अब्दूल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.
(हेही वाचा – तुम्हालाही मोफत LPG गॅस कनेक्शन मिळवायचे आहे? अशी करा नोंदणी)
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थाबाहेर आंदोलन केले. सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले, त्यामुळे संबंधित प्रकरणानंतर वेगळं वळण घेतले आणि वातावरण चांगलेच चिघळले. तर आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्र बघितला आहे. सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. सत्तारांना आशाप्रकारे विधान करताना लाज वाटली नाही का, अशी घाणाघाती टीकाही विद्या चव्हाण यांनी केली आहे.
काय म्हणाले होते सत्तार
सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटले होते की, पन्नास खोके तु्म्हाला पण मिळाले आहेत का… या प्रश्नावर उत्तर देताना सत्तार म्हणाले की, ते तुम्हाला हवे आहेत का.. यावर पु्न्हा सुळे म्हणाल्या की, तुमच्याकडे खोके असतील म्हणूनच तुम्ही मला ते ऑफर करत आहात. यानंतर उत्तर देताना सत्तारांची जीभ पुन्हा घसरली आणि त्यांनी शिवीगाळ केली. “इतकी भिकार*#@*# झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ, ते आम्हाला खोके बोलत आहेत त्यांचे डोके तपासायला पाहिजेत त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो, नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?”, असा सवालही त्यांनी आक्रमक होऊन उपस्थित केला आहे.
Join Our WhatsApp Community