भारतीय रेल्वेकडून महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्येच आता महिला प्रवाशांना रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये काही खास सुविधा देण्याबाबत रेल्वेमंत्र्यांनी घोषणा केली आहे. या सुविधांसोबतच रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेसाठीही काही निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
सहा बर्थ आरक्षित ठेवणार
लांब पल्ल्यांच्या गाड्या, एक्सप्रेस ट्रेनमधील स्लिपर कोचमध्ये महिलांसाठी सहा बर्थ राखीव ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर गरीब रथ,राजधानी एक्सप्रेस आणि दुरांतो एकस्प्रेस सारख्या वातानुकूलित एक्सप्रेस गाड्यांच्या थर्ड एसी कोचमध्येही महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
(हेही वाचाः मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, इतके वाढणार दर)
बोगींच्या संख्येवरुन ठरवणार जागा
वरिष्ठ नागरिक, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला तसेच गर्भवती महिला यांच्यासाठी सहा बर्थ आरक्षित असतील. गाड्यांच्या बोगीच्या संख्येद्वारे महिलांसाठी राखीव बर्थची संख्या ठरवली जाईल, असे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना
तसेच रेल्वेमध्ये महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरपीएफ,जीआरपी आणि जिल्हा पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना चांगली सुरक्षा देण्यात येईल. त्यासाठीही भारतीय रेल्वे प्रयत्न करत असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः EWS आरक्षणासाठी कोण असणार पात्र? वाचा संपूर्ण निकष)
Join Our WhatsApp Community