नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पर्यटनासाठी अनेक नागरिक मुंबई-गोवा दरम्यान प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष ट्रेनचे नियोजन केले आहे. ही गाडी मडगाव ते मुंबई सीएसएमटी या मार्गावर धावणार आहे.
( हेही वाचा : पावसाळा संपला! १ नोव्हेंबरपासून कोकणातील सर्व गाड्या धावणार नव्या वेळेत; पहा वेळापत्रक)
कोकण रेल्वेमार्गावर येत्या ११ नोव्हेंबर रोजी मडगाव-मुंबई सीएसएमटी मार्गावर विशेष गाडी धावणार आहे. 01428 क्रमांकाची ही विशेष गाडी एकमार्गी असून परतीचा प्रवास करणार नाही. ही गाडी येत्या शुक्रवारी, ११ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी (म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर) सुटणार असून बारा तासांनी म्हणजेच दुपारी बारा वाजून ५० मिनिटांनी ती आपला प्रवास पूर्ण करेल. ही गाडी करमळी, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर या स्थानकांवर थांबेल. गाडीला १७ डबे असतील. त्यापैकी १५ डबे द्वितीय श्रेणी शयनयान असतील.
गाडीची संरचना
१५ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन
असे करा आरक्षण
01428 वन-वे स्पेशल ट्रेनसाठी सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा, असे रेल्वेने सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community